देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. ते धनगर समाजाचे नेते आहेत.
सांगली : राज्यात एकतर्फी महाविजय मिळवल्यानंतर आता महायुती सरकार स्थापन करेल. या सरकारमध्ये जिल्ह्याच्या वाट्याला काय येणार, याची आता उत्सुकता लागली आहे. चौथ्यांदा आमदार झालेले विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade), हॅट्ट्रिक साधलेले सुधीर गाडगीळ, शिवसेनेचे सुहास बाबर, गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यापैकी कोणाला मंत्रिपदी संधी मिळेल, याकडे लक्ष आहे. त्यात पालकमंत्री कोण, हे पाहणेदेखील लक्षवेधी असेल.