राष्ट्रपती राजवटी बद्दलचा हा भाजपचा डाव आहे. उद्या निकाल लागेल आणि मग 24-25 तारखेला येथे आमदार पोहोचतील. बैठका होतील. विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील. केंद्रीय गृह मंत्रालयात भाजपचा कारभार असल्यामुळे आणि राजभवनात त्यांची शाखा असल्याने ते आम्हाला अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत. ते आज मुंबईत बोलत होते. यातच त्यांनी आता थेट मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहराच थेट सांगून टाकला आहे.