नागपूर : लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी इंडिया आघाडीला एक गठ्ठा मतदान केल्यानं भाजपची मोठी पिछेहाट झाली होती. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आता विश्व हिंदू परिषदेनं वेगळी रणनीती आखली आहे. यानुसार हिंदूंच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी संत संमेलनाचं विविध ठिकाणी आयोजन केलं आहे.यासाठी साधुसंतांना प्रचारासाठी उतरवण्यात येणार आहे. नागपूरमध्ये आयोजित संत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं.