२०१४ व २०१९ मध्ये मकरंद पाटील राष्ट्रवादीकडून आमदार झाले. पक्ष विभाजनात आमदार पाटील अजित पवार यांच्याकडे असल्याने यावेळीही ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उभे आहेत.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) स्थापनेपासून बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत पक्ष विभाजनाचा फटका बसल्याचे दिसून येते. १९९९ ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड उत्तर, वाई, कोरेगाव व पाटण मतपत्रिकेवर असणारे राष्ट्रवादीचे घड्याळाचे चिन्ह यावेळी गायब झाले आहे. जिल्ह्यात फलटण व वाई मतदारसंघातील मतपत्रिकेवर यावेळी राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक सुरू आहे.