साखर कारखानदारीशी संबंधित ऊस उत्पादकांची मते महत्त्वपूर्ण आहेत. कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याचा कालावधी आणि विधानसभेची निवडणूक एकच गाठ पडली आहे.
सातारा : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील (Satara Assembly Election) सातारा- जावळी वगळता उर्वरित सात मतदारसंघांत चुरशीच्या लढती होत आहेत. प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभेनंतर त्या -त्या मतदारसंघातील प्रचारातील चुरस वाढू लागली आहे. ऐन ऊस गळीत हंगामाच्या तोंडावर होत असलेल्या या निवडणुकीत साखरपट्ट्यातील (Sugar Factory) मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे या ऊस उत्पादक मतदारांना यावेळेस भाव आला आहे.