महायुतीचेच आमदार शंभूराज देसाई, मकरंद पाटील, महेश शिंदे, सचिन पाटील निवडून आल्याने जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे.
बिजवडी : सातारा जिल्ह्यात भाजप व महायुतीचे (Mahayuti) सर्व चिन्हावरील उमेदवार निवडून येतील हा शब्द आमदार जयकुमार गोरे यांनी कऱ्हाड येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. तो शब्द खरा ठरल्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘जयाभाऊ तुमचा शब्द खरा ठरला,’ असे म्हणत त्यांनी आमदार गोरे यांचे कौतुक करून शुभेच्छाही दिल्या.