फलटणमध्ये निंबाळकर घराण्याचे वर्चस्व असून, मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्यानंतर आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी या मतदारसंघावर आपले वर्चस्व राखले आहे.
सातारा : विधानसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य उमेदवारांसोबतच घराणेशाहीही आपले अस्तित्व टिकविण्यासाठी रिंगणात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात (Satara Assembly Elections) हे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये साताऱ्याचे भोसले (Bhosale Family of Satara), फलटणचे निंबाळकर, पाटणचे देसाई, कऱ्हाडचे पाटील व चव्हाण या प्रमुख घराण्यांचा समावेश आहे. त्यांची पुढची पिढी यावेळेस आपले नशीब आजमावत आहे.