'ती थोरल्‍या महाराजांची स्टाइल आहे, त्‍यांनाच ती शोभते'; केसांवर हात फिरवत उदयनराजेंबाबत काय म्हणाले शिवेंद्रराजे?

Satara-Jawali Assembly Election : इथे आलेला प्रत्‍येक जण आमच्‍यावरील प्रेमापोटी आला आहे. ते असेच मिळत नाही. त्‍यासाठी विश्‍‍वास मिळवावा लागतो.
Satara-Jawali Assembly Election
Satara-Jawali Assembly Electionesakal
Updated on
Summary

‘‘मतदारांनी आमच्‍यावर चार वेळा विश्‍‍वास, प्रेम दाखवत आमदारकीची संधी दिली. त्‍यांनी टाकलेल्‍या विश्‍‍वासाची उतराई आम्‍ही विकासकामांतून केली.''

सातारा : सलग पाच वेळा विधानसभा निवडणुकीसाठी मी अर्ज भरत आहे. चार वेळा आमदार म्‍हणून काम करण्‍याची संधी मला मतदारांनी दिली आहे. या संधीचे सोने करत मी मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावली. ही गर्दीच त्‍यामुळेच जमली असून, हे आमची शक्‍ती नव्‍हे, तर प्रेमाचे प्रदर्शन असल्‍याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांनी सांगितले. याच वेळी त्‍यांनी नाद करायचा... पण आमचा नाय, असे सांगत मतदार विरोधकांना २३ तारखेला सातारा-जावळीतून बायबाय करतील, असा विश्‍‍वासही त्‍यांनी या वेळी व्‍यक्‍त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.