सावंतवाडीतील लढत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), महायुतीतील बंडखोरीमुळे चर्चेत आली.
सावंतवाडी : येथील विधानसभा मतदारसंघात (Sawantwadi Assembly Constituency) बंडखोरीमुळे चुरस वाढली आहे. बंडखोरी आणि मतविभागणी यावर निवडणुकीचा निकाल ठरेल असा अंदाज व्यक्त होत आहे; मात्र विशेषतः काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला येथे बंडखोरी किंवा मतविभागणी नवी नाही. या आधी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांच्यासह दिग्गजांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढल्याचा इतिहास आहे.