Sawantwadi Elections : सावंतवाडीची लढत होणार चुरशीची; महायुती, महाविकासमध्ये बंडखोरी अटळ, चार दिग्गज रिंगणात

Sawantwadi Assembly Constituency Elections : तेली विरूद्ध केसरकर अशी दुरंगी लढत होईल आणि दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील बंडखोरी थोपवली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत होती.
Sawantwadi Assembly Constituency Elections
Sawantwadi Assembly Constituency Elections esakal
Updated on
Summary

सावंतवाडी मतदारसंघाला विधानसभेच्या राजकारणाचा मोठा इतिहास आहे. ताकद असलेले जास्त उमेदवार उभे राहिल्यास काय प्रभाव पडू शकतो, याची काही उदाहरणे आहेत.

सावंतवाडी : येथील विधानसभा मतदारसंघात (Sawantwadi Assembly Constituency) बहुरंगी लढतीची शक्यता जवळपास निश्‍चितीकडे जावू लागली आहे. ठाकरे शिवसेनेचे राजन तेली आणि महायुतीचे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याबरोबरच महाविकास आघाडीतील अर्चना घारे परब आणि महायुतीतील विशाल परब या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात या आधी अशा बहुरंगी किंवा ताकद असलेल्या उमेदवारांनी बंडखोरी केल्यास निकालावर प्रभाव पडू शकतो हे या आधीच्या काही लढतींमधून दिसून आले आहे. यामुळे ही बहुरंगी लढत सावंतवाडीला चुरशीकडे घेऊन जाणारी ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.