"लोकसभेत इथल्या लोकांनी नारायण राणेंना भरघोस मतांनी निवडून दिले. आज केसरकर आणि राणे एकत्र आले, हा विजयाचा शुभशकून आहे.’’
सावंतवाडी : येथील मतदारसंघात (Sawantwadi Assembly Election) गेली पंधरा वर्षे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) चांगले काम करीत आहेत. ते अभिमन्यू आहेत. त्यांना चक्रव्युहात लढण्याची सवय तर आहेच; पण तो कसा भेदायचा, हेही त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते विजयाचा चौकार मारून सावंतवाडीचा कप जिंकतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शनिवारी येथे केले.