सध्या तरी सावंतवाडी मतदारसंघात महायुतीकडून दीपक केसरकर, महाविकास आघाडीकडून राजन तेली रिंगणात असतील. आजपासून निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात (Sawantwadi Assembly Constituency) महायुतीकडून मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे; मात्र अद्याप ती जाहीर केलेली नाही. आता महाविकास आघाडी या मतदारसंघात उमेदवार कोण देणार? याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे. ठाकरे गटाकडून माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अर्चना घारे परब, तर भाजपकडून (BJP) युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष संजू परब हे इच्छुक रांगेत आहेत.