Mahayuti CM Candidates: "महायुतीत सात जण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार"; संजय राऊतांचा मोठा दावा

विधानसभा निवडणुकांची हवा आता हळूहळू तयार व्हायला लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
Sanjay Raut
Sanjay Rautesakal
Updated on

मुंबई : विधानसभा निवडणुकांची हवा आता हळूहळू तयार व्हायला लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तसेच त्यांच्याकडून वेगवेगळे दावेही केले जात आहेत. त्यातच आता शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे काही बॅनर सांगलीत लागले आहेत. यावर ठाकरेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. याचं समर्थन करताना खासदार संजय राऊत यांनी महायुतीतही सात जण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचं विधान केलं आहे.

Sanjay Raut
Video : जखमी वडिलांसाठी मुलगा बनला 'श्रावण बाळ'! खाटेची केली 'कावड' अन् नेलं रुग्णालयात

राऊत म्हणाले, सांगलीत चंद्रहार पाटील यांनी असे बॅनर लावले आहेत, या लोकभावना आहेत. पोस्टर किंवा बॅनर लावा असं आम्ही सांगत नाही. त्या भावना लोक अशा पद्धतीने व्यक्त करत असतात. त्याबद्दल कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही. काही पक्षात तीन तीन नेत्यांचे बॅनर लागतात भावी मुख्यमंत्री म्हणून. महायुतीत सात लोकं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत.

ठाकरेंचं नेतृत्व लोकांना मान्य

उद्धव ठाकरे यांनी संकट काळात राज्याचं जे नेतृत्व केलं ते लोकांना मान्य आहे. राज्य आणि देश संकटात असताना ठाकरेंनी ज्या पद्धतीनं रक्षण केलं ते लोक विसरलेले नाहीत. त्यामुळं उद्धव ठाकरे एक आश्वासक चेहरा आहेत. संघर्षातून ते फिनिक्स पक्षासारखे उभे राहिले आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी सत्ता, पैसे आणि दहशतीच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ओरबाडून घेतली.

आमचं चिन्ह, पक्ष ओरबाडून घेतला आणि गद्दारांच्या हातात पक्ष सोपवला. त्यांना वाटलं शिवसेना आणि नेतृत्व संपेल. पण त्या संकट काळातही ठाकरे जिद्दीनं उभे राहिले. त्यांनी आपला पक्ष नव्याने उभा केला. वेगळ्या चिन्हावर नऊ खासदार निवडून आणले आणि आज आम्ही विधानसभा जिंकण्याच्या दिशेने दमदार पाऊलं टाकत आहोत, हे सोपं नाही.

Sanjay Raut
कितीही कौतुक केलं तरी कमीच! ताराबाईंनी अंगावरच्या साडीची केली दोरी अन् 2 तरुणांना वाचवलं

गुजरातमधून कितीही चेले-चपाटे आले तरी...

गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले-चपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही. ठाकरेंचं नेतृत्व संपवता येणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथं फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा फॅन्स क्लबच चालतो. औरंगजेब फॅन्स क्लब भाजपा आणि गुजरातमध्ये आहे. कारण औरंगजेब गुजरातमध्ये जन्माला आला. आमच्याकडे शिवाजी महाराज जन्माला आले. आम्ही शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने निर्माण केली.

Sanjay Raut
Ashvini Bhave: मला इंडस्ट्रीमधला नवरा नकोच होता... अश्विनी भावेंचा खुलासा; म्हणाल्या- मी ज्या संस्कारात...

फडणवीस राजकारणातहे पावसाळ्यात उगवलेली छत्री

देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवलेली छत्री आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली. जसं आता राजस्थान, मध्य प्रदेश या भागांमध्ये मुख्यमंत्री नेमले गेले मात्र कोणालाच माहिती नाहीत. त्याचप्रमाणं त्याकाळी मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून फडणवीसांना पद दिलं गेल्यानं महाराष्ट्राला फडणवीस माहिती झाले. फडणवीसांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती.

पण कपटकारस्थानचा राजकारण, दळभद्री राजकारण, महारष्ट्र कलंकित करण्याचे राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यानं त्यांनी महाराष्ट्र कलंकित केला. आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करत आहे. या राज्याची बहुतांश जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते. याला जबाबदार ते स्वतः आहेत. नेतृत्व करण्याची एक उत्तम संधी त्यांनी गमावली. भाजपने या महाराष्ट्राचं एवढं नुकसान केलं आहे, जे भरून येणं सोपं नाही. त्यासाठी महाराष्ट्रात आम्हाला पुन्हा एकदा सत्तेवर यावे लागेल.

Sanjay Raut
Suinta Williams in Space : सुनीता विलियम्सचा पृथ्वीवरील परतीचा प्रवास पुन्हा लांबणीवर; नासाने सांगितेल्या कारणामुळे चिंता वाढली

चांगला गृहमंत्री असता तर...

फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला. आपल्या विरोधकांना बदनाम करण्यासाठी आणि संपवण्यासाठी तुरुंगात टाकून राज्य करण्यासाठी त्यांनी गृह खात्याचा देखील गैरवापर केला. त्यांच्या अवतीभवती भ्रष्ट, कलंकित, व्यभिचारी लोक आहेत. चांगला गृहमंत्री असता तर त्यांनी पाच मिनिटात अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात टाकलं असतं. इतके भ्रष्ट लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. मात्र, आता त्यांच्या सोबतीने ते राज्य करत आहेत. हे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.