''पुढील ५ वर्षे आमच्या हातात सत्ता द्या त्यांना लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.”
नाशिक : ‘‘ मी दहा वर्षांत काय केले? अशी टीका पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री करत आहेत. मी कृषिमंत्री असताना ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना (Constitution) बदलण्याचा त्यांचा डाव इंडिया आघाडीने उधळून लावला. महाविकास आघाडीकडून स्त्रियांना मोफत एसटी प्रवास, बेरोजगारांसाठी चार हजारांची आर्थिक मदत दिली जाईल,’’ असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी येथील सभांत बोलताना केले.