सचिन दोडके
उमेदवार
शिक्षण - बारावी
पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
वारजे येथील शेतकरी कुटुंबातून दोडके पुढे आले. बालपणी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने शेती व किराणा दुकानाचा व्यवसाय करून कुटुंबाला सावरले. बालपणापासूनच आजोबांसमवेत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) गेलेल्या त्यांच्यासह अन्य कुटुंबांची शेती, जमिनींसाठी काम करण्यास सुरुवात केली. विद्यार्थिदशेतच राष्ट्रवादी काँग्रेससमवेत जोडले गेले. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांची जवळीक वाढली. पक्षाने २०१९ मध्ये विधानसभेची संधी दिली; मात्र थोड्या फरकाने अपयश आले. पक्षफुटीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासमवेत ते राहिले.