मुंबई: ‘‘राजकारणातून मी अजिबात निवृत्त होणार नाही. संसदीय कामकाज करण्याऐवजी मी पक्ष संघटनेचे काम करणार आहे. राजकारणात एक नवी पिढी तयार करायची आहे. जी महाराष्ट्राच्या हिताचे पुढील पाच- ५० वर्षांचे नियोजन करेल,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. भाजपबरोबर गेलेल्यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मांडली.