उदगीर (जि. लातूर) : महायुती सरकार फक्त तोडाफोडीचे राजकारण करत आहे. त्यामुळे राजकीय अस्थिरता राज्यात निर्माण झाली आहे. यासाठी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी व राज्याचा विकास साध्य करण्यासाठी महाविकास आघाडीला संधी द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.