Latest Dhule News: ‘‘हा देश बळी राजाचा आहे. एकेकाळी गहू आयात करणारा देश गव्हाचा निर्यातदार बनला आहे. कांदा पिकाला भाव द्यायचा असेल तर कांद्याची निर्यात केली पाहिजे. मात्र, मोदी सरकारने कांदा निर्यात बंद केली.
मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्यात केली.