Maharashtra Vidhan Sabha: शिवसेना फोडण्याचे काम शरद पवारांनी केले. मी काय शिवसेना फोडू शकलो नव्हतो, असा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी केल्यानंतर आता शरद पवारांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिले आहे. साम टिव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, छगन भुजबळ आणि त्यांचे सहकारी त्या पक्षात अस्वस्थ होते ते बाहेर पडायच्या नादात होते. त्यांनी संपर्क साधू इच्छिला म्हणून मी ही संपर्क साधला आणि त्याच्यामध्ये काही चुकीचे नव्हते. कोणताही पक्ष आपली ताकद कशी वाढेले हेच पाहत असतो. असे प्रत्युत्तर शरद पवारांनी मुलाखतीदरम्यान दिले.