latest Marathwada News: फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसच्या पारड्यात जातो. मात्र, यावेळेस विद्यमान माजी आमदार डॉ. कल्याण काळे खासदार झाल्यामुळे या फुलंब्री विधानसभा मतदारसंघ आपल्याच पक्षाला सोडवून घेण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि ठाकरे गटाकडून वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी (शरद पवार गट) व ठाकरे गटाचा डोळा असल्याचे दिसून येऊ लागले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) व ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार जागा आमच्याच पक्षाला सुटणार असल्याचा दावा करू लागले आहे.