मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. पण अद्यापही मविआचं जागावाटप पूर्ण झालेलं नाही, उलट काँग्रेस आणि शिवसेनेत काही जागांवरुन वाद सुरु असल्याचं चित्र आहे. या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांविरोधात दंड थोपटत आहेत. या गोंधळाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे या दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाची भूमिका निभावत आहेत.