Maharashtra Assembly Election
Sangamner Assembly Election 2024 : संगमनेरचीही निवडणूक आळणी ,शुगर लाॅबीतल्या दोन मातब्बर नेत्यांची ऐनवेळी माघार
sangamner vidhan sabha Election 2024 : कोपरगाव आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघात चुरशीचे सामने पहायला मिळतील. अशी अटकळ बांधली जात होती.
शिर्डी : कोपरगाव आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघात चुरशीचे सामने पहायला मिळतील. अशी अटकळ बांधली जात होती. या दोन्ही मतदारसंघांत चुरशीच्या सामन्यांची सराव आणि पूर्वतयारी जोरात सुरू होती. मात्र, ऐनवेळी जोरदार टक्कर देऊ शकणाऱ्या संघांनी मैदानात न उतरणे पसंत केले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील लढती तुलनेत अगदीच आळणी झाल्या आहेत.