ईव्हीएम मशीन हॅक करून तुम्हाला विजयी करून देतो. त्यासाठी ४२ लाख रुपये लागतील. पैसे न दिल्यास मशीन सेट करणारे माझ्या ओळखीचे असून त्यांना सांगून तुमचा पराभव निश्चित असल्याचे सांगत उमेदवाराकडून ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या भामट्याला पोलिसांनी ४ तासांत ताब्यात घेतले. निवडणुकांमध्ये पैसे कमवण्याची संधी पाहून आपण हा प्रकार केल्याचे आरोपीने कबूल केले. या घटनेनं खळबळ उडाली आहे.