विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले, या नंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 'हा लावून घेतलेला निकाल' आहे, अशी टीका केली. राऊत यांनी महायुतीतील नेत्यांवर टीका करत ईव्हीएमवर शंका घेतली होती. आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही, त्यांना आता मेंटल हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे.