Shivsena UBT Candidate 3rd List : विधानसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी तीन शिलेदार जाहीर! 'येथे' पाहा तिसरी यादी

Shivsena UBT Candidate 3rd List : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणखी तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
 Shivsena ubt
Shivsena ubt
Updated on

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणखी तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या जगावाटपात वर्सोवा मतदारसंघावरून असलेला तिढा अखेर निकाली निघाला आहे. वर्सोव्याची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली आहे. वर्सोवा येथून माजी नरगरसेवक हरून खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विलेपार्लेच्या जागेवरून आप सोबत वाटाघाटी सुरु होती. मलबार हिलच्या बदल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला विलेपार्ले जागा सोडण्यात आली आहे. येथे माजी नगरसेवक संदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर घाटकोपर पश्चिम येथून संजय भालेराव निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.