श्रीगोंदे नगर विधानसभा : या मतदारसंघात दोन प्रमुख पक्षांकडून महिलांना उमेदवारी मिळून त्यांच्यात आमनेसामने लढत होणारी श्रीगोंद्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. गेल्या पाच दशकांपासून प्रतिस्पर्धी राहिलेले पाचपुते व नागवडे कुटुंब या निवडणुकीत पंधरा वर्षांनी पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले आहेत.