मालवणमधील निवडणूक राजकीय इतिहास बदलण्यासाठी ठरली. तेथील राजकारणात राणेंच्या रूपाने तरुण, तडफदार नेतृत्वाचा उदय झाला होता.
Sindhudurg Assembly Election 1990 : शिवसेनेचा पर्यायाने नारायण राणेंचा (Narayan Rane) राजकीय प्रभाव सुरू करणारी निवडणूक म्हणून १९९० मध्ये झालेल्या विधानसभेच्या लढतीकडे पाहिले जाते. समाजवादी आणि काँग्रेस यांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदा राणेंच्या रूपाने शिवसेनेचा झेंडा रोवला गेला. यानंतरच्या भगव्या वादळात समाजवादी आणि काँग्रेसची एक-एक सत्तास्थाने अक्षरशः उडून गेली.