विद्यमान आमदार नीतेश राणे यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढविली.
Sindhudurg Assembly Election : सिंधुदुर्गात २०१९ ला झालेली विधानसभा निवडणूक आमदार तेच देणारी ठरली; मात्र २०१४ च्या तुलनेत मताधिक्यात बदल झाला. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असली तरी, तिन्ही मतदारसंघांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या दोन पक्षांमध्येच लढत झाली. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या भोवतीच सिंधुदुर्गाचे राजकारण फिरत राहिल्याची प्रचिती २०१९ च्या निवडणुकीत आली. याचा परिणाम म्हणून भाजप (BJP) आणि शिवसेना यांच्यातच आमदारकीसाठी स्पर्धा झाली.