महायुतीकडून केसरकरांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट होताच तेलींनी ठाकरे शिवसेनेशी संधान बांधत उमेदवारी मिळविली आहे.
ओरोस : सिंधुदुर्गात (Sindhudurg Assembly Election Politics) ठाकरे शिवसेनेचे (Shiv Sena) राजकीय टार्गेट अचानक बदलून भाजपऐवजी शिंदे शिवसेना झाली आहे. अगदी चार दिवसांत हे बदल झाले. तीन पैकी दोन मतदारसंघांत दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही राजकीय ‘स्ट्रॅटजी’ बदलून ठाकरे शिवसेनेने भाजपला गोंजारण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे टार्गेट आता राणे, केसरकर आणि शिंदे शिवसेना आहेत.