शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये आजवर मराठी माध्यमाच्या शाळा होत्या. अशा मराठी माध्यमाच्या शाळांमध्येही परप्रांतीय मुले शिकत होती. पण, आता त्यांना इंग्रजी माध्यमाचा पर्याय गावागावांतही उपलब्ध झाला आहे.
कणकवली : परराज्यांतून नागरिक कोकणात (Konkan) मोठ्या प्रमाणात वास्तव्याला येत आहेत. वर्षानुवर्षे स्थायिक झालेले परप्रांतीय दक्षिणेकडील होते. परंतु, आता उत्तरेकडीलही परप्रांतीयांची संख्या कमालीची वाढली आहे. आता वाढलेला हा परप्रांतीयांच्या मतांचा गठ्ठा कुणाच्या पारड्यात पडणार, यावरही निकाल अपेक्षित आहे. परप्रांतीयांचा प्रत्येक व्यवसायातील प्रवेश हे स्थानिक व्यावसायिक आणि बेरोजगारांच्या रोजगारावर गदा आणणारे ठरत आहेत.