Sindhudurg Elections : बंडखोरी थोपवण्यासाठी 'काऊंटडाऊन' सुरू; सिंधुदुर्गात वजनदार इच्छुकांमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली

Sindhudurg Assembly Elections : बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आधीच मतदारांचा कल कसा असेल, याबाबत संभ्रम आहे.
Sindhudurg Assembly Elections
Sindhudurg Assembly Electionsesakal
Updated on
Summary

कुडाळमधून महाविकास आघाडीतर्फे ठाकरे शिवसेनेच्या वैभव नाईक यांची उमेदवारी निश्‍चित आहे. त्यांच्या विरोधात कोण लढणार याची उत्सुकता ताणली आहे.

सावंतवाडी : सिंधुदुर्गात वजनदार इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे महायुतीसह महाविकास आघाडीच्याही (Mahavikas Aghadi) नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. युती आणि आघाडीत जागा कोणाला सुटणार, याचीच स्पष्टता नसल्याने इच्छुकांमध्येही कमालीचा संभ्रमावस्था आहे. यातच निवडणुका जाहीर झाल्याने बंडखोरी थोपवण्यासाठीचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक सिंधुदुर्गात (Sindhudurg Constituency) तरी कमालीची चुरशीची असेल, असे आजचे चित्र आहे. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आधीच मतदारांचा कल कसा असेल, याबाबत संभ्रम आहे. त्यातच यावेळी तिन्ही मतदारसंघात सक्षम इच्छुकांची भाऊगर्दी आहे. #ElectionWithSakal

गेल्या पाच-सहा महिन्यांत त्यांनी मतदारांमध्ये जात वातावरण निर्मिती केली आहे. यामुळे उमेदवारी न मिळाल्यास हे इच्छुक पर्याय शोधण्याची शक्यता असल्याने बंडखोरीचे सावट प्रमुख पक्षांवर अधिक गडद होऊ लागले आहे. एकीकडे अशी स्थिती असली तरी युती आणि आघाडी अशा प्रमुख दोन्ही राजकीय गटांमध्ये जागावाटप ठरलेले नाही. त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्या तरी राजकीय चित्र मात्र अजूनही अंधूकच आहे. यामुळे पुढील आठवडाभरात वेगवान घडामोडी होणार आहेत. याचा थेट प्रभाव एकूणच जिल्ह्याच्या राजकारणावर दिसणार आहे.

Sindhudurg Assembly Elections
Satara : आठही मतदारसंघांत राजकीय घमासान; विद्यमान आमदारच उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, 'या' नेत्यांत थेट लढत

सर्वाधिक चुरस सावंतवाडीत

सर्वाधिक चुरस सावंतवाडीत आहे. येथे महायुतीतर्फे भाजप आणि शिंदे शिवसेना अशा दोघांचाही उमेदवारीसाठी दावा आहे. विद्यमान आमदार दीपक केसरकर यांची उमेदवारी निश्चित असल्याचे त्यांचे पदाधिकारी सांगत आहेत. गेल्या पंधरवड्यात केसरकर यांनी मतदारसंघात कोट्यवधीच्या कामांची भूमिपूजने केली. निधींच्या घोषणांची कोटी कोटीची उड्डाणे पाहायला मिळाली. त्यांनी या आधीच्या तिन्ही टर्मपेक्षा यावेळी अधिक जोरकसपणे लढण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. याचवेळी भाजपकडे माजी आमदार राजन तेली, युवा नेते विशाल परब आणि माजी नगराध्यक्ष संजू परब अशी वजनदार इच्छुकांची यादीच आहे.

या तिघांनीही कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे महायुतीतील जागा कोणाला सुटणार, हे ठरल्यानंतर येथे वेगवान राजकीय हालचालींची शक्यता आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सौ. अर्चना घारे-परब यांनी गेली पाच-सहा वर्षे संघटना बांधणी केली आहे. अलीकडचे पक्षाचा मेळावा घेऊन ही जागा आपल्यालाच मिळेल, असे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केले आहे.

Sindhudurg Assembly Elections
'विधानसभा निवडणुकीत महायुती 170 पेक्षा जास्त जागा जिंकणार'; साईदर्शनानंतर रामदास आठवलेंना विश्वास

दुसरीकडे ठाकरे शिवसेना मात्र हा आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याचा भक्कम दावा करत आहेत. त्यांच्याकडे तूर्त तरी पूर्ण मतदारसंघावर प्रभाव टाकणारा इच्छुक नाही; मात्र इतर पक्षांतील एक वजनदार नेता ऐनवेळी ठाकरे शिवसेनेतून उमेदवारी मिळवत निवडणूक लढवण्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. ही चर्चा वास्तवात आल्यास येथील लढाई अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Sindhudurg Assembly Elections
कोल्हापुरातील 'या' मतदारसंघांत प्रतिष्ठेच्या लढती, महाडिक-पाटीलच पुन्हा आमनेसामने; कागल, इचलकरंजी, चंदगडमध्ये काय स्थिती?

वैभव नाईक यांच्याविरोधात कोण?

कुडाळमधून महाविकास आघाडीतर्फे ठाकरे शिवसेनेच्या वैभव नाईक यांची उमेदवारी निश्‍चित आहे. त्यांच्या विरोधात कोण लढणार याची उत्सुकता ताणली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही उमेदवारी शिंदे शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे; मात्र त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार नाही. येथून माजी खासदार नीलेश राणे यांनी दीर्घकाळ भाजपमधून मोर्चेबांधणी केली आहे; मात्र कणकवलीत त्यांचे बंधू नीतेश यांची उमेदवारी पक्की असल्याने एकाच घरातील दोघांना भाजप तिकीट देणार का हा प्रश्‍न आहे.

ऐनवेळी ही जागा शिंदे गटाकडे देऊन नीलेश राणेंना धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी देण्याची खेळी खेळली जाईल, अशी गेले काही दिवस चर्चा आहे. नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर याबाबतची शक्यता वाढली होती; मात्र भाजप जिंकण्याची संधी असलेल्या जागा कमळ चिन्हावरच लढवण्याला प्राधान्य देण्याचे धोरण आखत आहे. नीलेश राणे हे नाईक यांना तुल्यबळ लढा देणार आहेत. त्यामुळे ही जागा भाजपकडेच ठेवून अपवाद म्हणून दोन्ही राणे बंधूंना उमेदवारी देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.