उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली तरीही महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जिल्ह्यातील ११ जागांपैकी सोलापूर दक्षिण, मध्य आणि अक्कलकोट तीन जागा काँग्रेसला मिळेल, अशी चर्चा आहे. सोलापूर दक्षिणची जागा काँग्रेसला गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुलाखत दिलेले उमेदवार संतोष पवार हे विधानसभेची परीक्षा वंचित बहूजन आघाडीमधून देण्याची दाट शक्यता आहे.