लोकसभा निवडणुकीत माढ्यातून तुतारीने तब्बल ५८ हजार ४२१ मते घेतली होती. माढ्यात चाललेली तुतारी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात फेल गेल्याचे दिसले.
सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडील राष्ट्रवादीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव तर तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह मिळाले. लोकसभा निवडणुकीत रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दहा पैकी ८ खासदार विजयी झाले तर फक्त तुतारी या चिन्हाने राज्यात ४ लाख १४ हजार मते मिळवली. भारत निवडणूक आयोगाने आता ट्रम्पेटचे (Trumpet) भाषांतर हे ट्रम्पेटच ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीत चाललेले तुतारी हे चिन्ह आता ट्रम्पेट नाव घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी आले आहे.