आपल्याला भारताला विश्वगुरूपदावर पोचवायचे आहे. त्यामुळे धोकेबाज लोकांपासून सतर्क राहा, असे आवाहनही माधवी लता यांनी यावेळी केले.
सोलापूर : चुकीच्या व्यक्तीला मतदान केल्यामुळे पुढील पाच वर्षे संपूर्ण समाजाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हिंदुस्थानला शत्रूपासून मुक्त करण्यासाठी देशप्रेमी उमेदवारांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन हैदराबादच्या हिंदू नेत्या माधवी लता (Hindu leader Madhavi Latha) यांनी केले. विश्व हिंदू परिषदेतर्फे (Vishwa Hindu Parishad) आयोजित लोकजागर अभियानांतर्गत रविवारी (ता. १०) माधवनगर पटांगणात त्यांचे व्याख्यान पार पडले.