''सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी; अन्यथा त्यांना परिणाम भोगावे लागतील.''
सोलापूर : सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसने (Congress) आपला उमेदवार मागे घ्यावा. हा मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) सुटावा यासाठी ४ नोव्हेंबर रोजी सोनिया गांधींची भेट घेणार आहोत. त्यामुळे आम्ही ४ नोव्हेंबरपर्यंत काँग्रेसला अल्टिमेटम देत आहोत. तोपर्यंत आम्ही वाट पाहू. पण, चार तारखेपर्यंत सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला न सुटल्यास आम्ही ५ नोव्हेंबरला खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट करू. त्यात काँग्रेसच्या चिंधड्या उडतील, अशा शब्दांत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी आपला राग व्यक्त केला.