विधानसभा निवडणुकीच्या सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघाच्या मैदानात सद्य:स्थितीत तब्बल ३३३ उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सोमवारचाच (ता. ४) दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी यातील कितीजण उमेदवारी मागे घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पण, प्रत्येक उमेदवाराला त्या मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश (उदा. एकूण मतदानातील एक लाख ८० हजार मते वैध असल्यास त्यापैकी ३० हजार मते पडायलाच हवीत) मते घ्यावीच लागतील, अन्यथा त्यांना डिपॉझिट परत मिळणार नाही.