Solapur: चौरंगी लढतीचा शक्तीप्रदर्शनाने मंगळवेढ्यात समारोप

Solapur: चौरंगी लढतीचा शक्तीप्रदर्शनाने मंगळवेढ्यात समारोप
Updated on

Latest Managalvedha News: चौरंगी झालेल्या विधानसभेच्या आखाड्यात अखेरच्या दिवशी आठवडा बाजारात शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा समारोप केला. पदयात्रेमध्ये पुरुषापेक्षा महिलांचीच अधिक गर्दी होती. प्रचार समाप्तीनंतर होणाऱ्या अर्थपूर्ण घडामोडी उमेदवाराच्या निकालावर परिणामकारक ठरू शकतात.

यंदाच्या आखाड्यात 24 उमेदवार आखाड्यात असले तरी लढत मात्र चौरंगी झाली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आमदार आवताडे व भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी विविध कार्यक्रमातून तर भगीरथ भालके यांनी जन आशीर्वाद यात्रेतून निवडणुकीपूर्वी वातावरण निर्मिती केली. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. समाधान आवताडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

महिन्याभरापूर्वी मारोळी, पाटकळ, व अन्य ठिकाणी अवताडेवर आरोप केलेले प्रशांत परिचारकांनी आपली तलवार म्यान करत माचनूरच्या प्रचार शुभारंभात हजेरी लावून पक्षाचे काम सुरुवात केली. प्रचाराचा रणधुमाळीत भगीरथ भालके यांनी आमदारावर साडेतीन वर्षातील कामगिरीवरून मदत केलेल्या कार्यकत्याची अडवणूक करणे, निधीसाठी विरोधी कार्यकर्त्याला पक्षप्रवेशाचे आमीष दाखवणे असे आरोप केले तर आवताडे यांनी भगीरथ भालके यांच्यावर नाॅटरिचीबलचा आरोप करत टीका करणे टाळत 3000 कोटीच्या निधी व पाण्याच्या मंजुरीचा मुद्दा,एम. आय.डी.सी. अधिक प्रभावी मांडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.