प्रमिला चोरगी,
सोलापूर : सोलापूर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीतील बिघाडी आणि समाजावर गेलेली निवडणूक हेच वातावरण भाजपसाठी अनुकूल ठरले. काँग्रेस नेत्यांच्या कुरघोड्यामुळे शेवटच्या क्षणी मराठा समाजाने दाखविलेली एकी आणि लाडकी बहीण योजनेमुळे ना भूतो ना भविष्यती अशा अनपेक्षित मताधिक्क्याने भाजपचे सुभाष देशमुख यांनी हॅट्ट्रिक साधली.