पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज होते. यानंतर ते बेपत्ता झाले होते. अखेर 36 तासांनंतर ते कुटुंबाशी संपर्कात आले आहेत. मात्र, त्यांच्या अज्ञातवासाचे ठिकाण अद्यापही समजू शकलेले नाही. वनगा सोमवारी अचानक 'नॉट रिचेबल' झाले होते, त्यामुळे त्यांची गायब होण्याची बातमीने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.