मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि वडगाव शेरी (पुणे) मतदारसंघातील उमेदवार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कायदेशीर नोटीस दिल्याचा दावा पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.