काटेवाडी: पाच प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केले आहेत. मात्र माझे त्यांना केवळ हेच उत्तर असेल. नाही...नाही नाही.. नाही... या ऑडिओ क्लिप मधील आवाज माझा नाही. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांना माझे एकच सांगणे आहे की ते म्हणतील ती जागा ते म्हणतील ते ठिकाण तेथे येऊन त्यांना उत्तर देण्याची माझी तयारी आहे. या खोट्या ऑडिओ क्लिप ची मी कालच सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी कठीत ऑडिओ क्लिप प्रकरणी झालेले सर्व आरोप फेटाळून लावले.