वाळूजमहानगर : भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत विधानसभेच्या गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून गरुडझेप अकॅडमीचे संचालक सुरेश सोनवणे हे निवडणूक रिंगणात उतरले असून ते अपक्ष म्हणून २८ तारखेला उमेदवारी दाखल करणार आहेत. त्यामुळे मातब्बरांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निवडणुकीत ‘बंबास्त्रा’वर ‘गरुडझेप’ भारी पडणार असल्याची चर्चा आतापासूनच होत आहे.