मुंबई : कथीत पत्राचाळ घोटाळाप्रकरणातील साक्षीदार राहिलेल्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. उद्धव ठाकरे गटावर सडकून टीका करताना पत्राचाळ, खिचडी कंत्राट या भ्रष्टाचारांवर भाष्य होऊ नये यासाठी साक्षीदारांना अत्याचाराच्या धमक्या देणाऱ्या घाबरट आणि पळकुट्या लोकांशी आता मी थेट दोन हात करणार आहे, असं पाटकर यांनी ट्विटरवर सविस्तर पोस्ट करत म्हटलं आहे.