तेल्हारा : गेल्या कित्येक वर्षापासून तेल्हारा शहरातून जाणारा रस्ता अरुंद असून, याबाबत याआधी निवडून येणाऱ्या आमदार यांनी फक्त बायपास रोड करू, असे सांगत मतदारांची बोळवण केली. तसेच तालुक्यात मिलिटरी कॅम्प मंजूर होऊनही केवळ श्रेयापाई इतर तालुक्यात पळवून नेल्याने तालुक्यातील युवकांना रोजगार मिळाला नाही.