उल्हासनगर : गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासोबतच्या अबोल्यामुळे अंबरनाथ विधानसभेत आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या विरोधात वातावरण निर्मिती तयार झाली होती.अशातच कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मध्यस्थी केल्यावर व त्यासाठी उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनीही भूमिका निभावल्यावर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा दरबारी अरविंद वाळेकर आणि बालाजी किणीकर यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाचा मार्ग सुकर झाला आहे.