Latest Thane News: शिवसेना ठाकरे गटाचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील उमेदवार केदार दिघे यांच्यासह इतरांवर कोपरी पोलिस ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन करीत मद्यवाटप केल्याप्रकरणी बुधवारी (ता. २०) गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. १९) रात्री उशिरा घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुसरीकडे केदार दिघे यांनी मात्र याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, ‘सत्ताधारी घाबरले असून माझी गाडी मी स्वतःहून पोलिस ठाण्यात नेल्यानंतर त्या गाडीची तपासणी होऊन त्यामध्ये काहीही सापडले नसताना जाणीवपूर्वक माझे नाव गुन्ह्यामध्ये घेण्यात आले.