छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आले. प्रशासनाकडून बुधवारी (ता.१६) सकाळपासूनच बैठका घेण्यात आल्या. येत्या ४८ तासांत, ७२ तासांत कोणत्या कामांवर तातडीने लक्ष दिले पाहिजे, आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन कसे करावे याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी मार्गदर्शन केले.