यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आटोपले आहे. मतदारांनी आपला कौल दिला आहे. ७२ तासानंतर कोण जिंकणार, कोण पराभूत होणार याचा निकाल हाती येणार आहे. असे असले तरी अनेक नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी ही निवडणूक ठरणार आहे. मतमोजणीनंतर काहींना संजीवनी मिळणार असून काहींची सक्रिय राजकारणातील ही अखेरची निवडणूकही ठरण्याची शक्यता आहे.