Dhamangaon Railway Assembly : धामणगाव मतदारसंघ पारंपारिक लढतीसाठी सज्ज...जगताप, अडसड, विश्वकर्मा यांच्यात रंगणार सामना

Dhamangaon Railway vidhan Sabha Election : धामणगाव मतदारसंघात यंदा अरुण अडसड, वीरेंद्र जगताप आणि नीलेश विश्वकर्मा यांच्यात पारंपरिक लढत रंगणार आहे. या क्षेत्रात काँग्रेसची दीर्घकाळ सत्ता राहिलेली आहे, त्यामुळे मतदानाची चुरस अधिकच वाढली आहे.
Dhamangaon Railway Assembly
Dhamangaon Railway Assembly esakal
Updated on

अमरावती : भाजप तसेच काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या लढतीसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या धामणगावरेल्वे मतदारसंघात यंदासुद्धा पारंपरिक लढत होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांचे चिरंजीव प्रताप अडसड यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपासून या मतदारसंघावर ताबा मिळविला असून त्यांची लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. वीरेंद्र जगताप यांच्याशी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.