छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने चहा-नाश्ता, पाणी व जेवणाच्या थाळीचे दर निश्चित केले. यामध्ये चहा-कॉफी २०, नाश्ता पदार्थानुसार २० ते ५०, पाण्याची बाटली १५, शाकाहारी थाळी १००; तर मांसाहारी थाळीचे दर २०० रुपये आहेत. जवळपास ५०० वस्तूंचे दर निवडणूक आयोगाने ठरवून दिले. ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उमेदवारांवर कारवाई होणार आहे.